गोल्फ क्लबच्या वैभवात ‘टॉवर क्लॉक’ने भर!
- byGWC
- 3 years ago
घड्याळाच्या काट्यानुसार वेळेचे नियोजन करणे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अगदी मैदानांवरदेखील वेळेचा मेळ साधणे अपरिहार्य ठरत आहे.
घड्याळाच्या काट्यानुसार वेळेचे नियोजन करणे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अगदी मैदानांवरदेखील वेळेचा मेळ साधणे अपरिहार्य ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गोल्फ क्लबवर ७० फुटांचे ‘टॉवर क्लॉक‘ उभारण्यात आले असून, त्यामुळे क्रीडाप्रेमींची सोय होण्यासह गोल्फ क्लबच्या वैभवातही भर पडली आहे.
महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत नाशिकच्या गणेश वॉच कंपनीने हे टॉवर क्लॉक उभारले आहे. व्यायाम, खेळ, विविध प्रदर्शने अशा विविध कारणांसाठी गोल्फ क्लब परिसरात कायमच वर्दळ दिसून येते. या भागात येणाऱ्या सर्वांनाच आता स्वतःकडे घड्याळ नसले, तरी वेळ जाणून घेण्यासाठी टॉवर क्लॉकची मदत होणार आहे. गणेश वॉच कंपनीचे संचालक विजय खडके आणि त्यांचे पुत्र अमोल यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्निशिअन राहुल चौधरी यांनी हे घड्याळ बसविले आहे. सहा फूट व्यासाचे असे चारही दिशेला एकाच मशिनवर चालणारी चार घड्याळे यात बसविण्यात आली आहेत.
अंधारातही समजणार दुरून वेळ
क्वार्टज टेक्नालॉजीचे हे घड्याळ इलेक्ट्रिक सप्लाय व बॅटरी बॅकअपवर चालणार आहे. या घड्याळाच्या डायलमागे बॅकलाइट असल्याने रात्रीच्या अंधारात घड्याळ दुरूनही स्पष्ट दिसू शकणार आहे. जमिनीपासून ७० फूट उंचीवर हे घड्याळ असून, पुढील तीन वर्षे गणेश वॉच कंपनी देखभाल करणार आहे. टॉवर क्लॉकला बाहेरून काच नसते. मात्र, सर्व प्रकारच्या वातावरणात हे घड्याळ तग धरू करू शकणार आहे. घड्याळातील दोन काट्यांचे वजन साधारण तीन किलो म्हणजे चार डायलचे मिळून १२ किलो आहे. त्याला चालवणारे मशिन तेवढ्याच ताकदीचे आहे.
अशा प्रकारच्या घड्याळांची निर्मिती करून भारतभरात अनेक ठिकाणी आम्ही बसविली आहेत. नाशिक परिसरातील असे हे तेरावे घड्याळ आहे. गोल्फ क्ल भागात येणारे नागरिक, क्रीडापटू आदींसाठी हे घड्याळ उपयुक्त ठरेल.
-विजय खडके, संचालक, गणेश वॉच कंपनी
वैशिष्ट्यांवर दृष्टिक्षेप…
-७० फूट क्लॉक टॉवरची एकूण उंची
-०६ फूट व्यासाची चारही दिशांना घड्याळे
-०१ मशिनवर चालणार सर्व घड्याळे
-०३ किलो घड्याळातील दोन काट्यांचे वजन
-१२ किलो चार डायलचे मिळून वजन
-०३ वर्षे तीन वॉच कंपनी करणार देखभाल